आमची यशोगाथा
पळसे – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र
नाशिक-पुणे राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,पळसे गाव. सुमारे ११७२ १ लोकवस्तीचं हे गाव दारणा नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.
पळसे गाव निर्माण होण्याची प्रक्रिया थोडी गमतीशीर आहे. शेकडो वर्षापूर्वी तीन बंधू शेकडो गाई बैल संसारा उपयोगी साहित्य घेऊन पाण्याच्या शोधात असे गावच्या शिवारास स्थायिक झाले. त्यावेळेस तेथे "पळसाचे झाड" असावे त्यावरून पळसे हे नाव गावाला लावले. अशी जुन्या पिढीतील गावकऱ्यांकडून सांगितलेली कथा आहे. या गावची पश्चिमेकडील सीमा दारणा नदीने ५ किमी वेडली आहे. बारा महिने नदीला पाणी असल्याने या तीन बंधूंनी तेथेच मुक्काम ठोकला तो आजपर्यंत चालू आहे. व्यवसायाचे स्वरूप त्याचे आडनावात रूपांतर आहे. गायधनी ,गायखे ,आगळे हे नाव घेऊन पिढ्या वास्तव्य करीत आहे. हे तीन सख्खे भाऊ असल्याने आजपर्यंत त्या यांच्यामध्ये आपापसात विवाह संबंध होत नाही, हे विशेष आहे, कालांतराने पगार एखंडे, साठे, शिंदे,ढेरिंगे, सरोदे, अष्टेकर, उघडे, पवार ,धोंगडे, चंद्रमोरे, थेटे आडनावाची माणसं स्थायी झाली
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
पळसे गावची एक खासियत म्हणजे संत आईसाहेब महाराज समाधी.पळसे गावचे जमिनीचे क्षेत्र तसे नाशिक तालुक्यात सर्वाधिक आहे, १८७०.२९ हेक्टर जमीन गावाच्या शिवारात आहे.
नाशिक शहरापासून २० किमी अंतरावर असल्याने आज झपाट्याने गाव शहरीकरणाकडे वाट्यात करीत आहे. असं असले तरी पळसे गावात शेती आजही तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून करीत आहे.पळसे गावचे वैशिष्ट्ये :-
थोर दानशूर अहिल्याबाई होळकर यांनी १९६७-७० दरम्यान गावाकरिता बारव बांधली. आजही तिचे अस्तित्व आहे ३०० वर्षांपूर्वी कामस मांडवगण जिल्हा अहिल्यानगर येथील तरुण साध्वी संत आईसाहेब महाराज यांनी पळसे गावी येऊन गाव परिसरात धार्मिक कार्य केले व याच गावात त्यांचे सद्गुरु पळसेकर महाराज यांचे समावेश जिवंत समाधी घेतली. गावात येऊन वेगळे ओळखू त्यामुळे प्राप्त झाली. आज त्यांचे नावाने गावकऱ्यांनी व शैक्षणिक संस्थेने माध्यमिक विद्यालय सुरू केले आहे. दर्जेदार शिक्षण घेऊन गावातील व परिसरातील सर्वसामान्य परिस्थितीतील मुले मुली शिक्षण घेऊन जीवनात यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे.
संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची पायी जाणाऱ्या दिंडीचा मुक्काम पळसे गावी असतो. तेथे वारकऱ्यांचा सन्मान करून गावकरी अन्नदान करीत असतात. त्यामुळे कुणीतरी गावचं वैशिष्ट्य नमूद करताना म्हणतात, "पळसे- पळसे- येथे करिता दिंडीचा कळस !" पहिलवानकी करणे, टांग्यांच्या शर्यती, यांचा मोठा नाद काहीकाळपूर्वी गावाला होता आता त्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मात्र अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात सतत काहीतरी कार्यक्रम वर्षभर चालू असतात १९६९ साली दारणा नदीस मोठा महापूर आला गाव सर्व बाजूने पाण्याने वेढण्याची वेळ आली .हा सर्वात मोठा महापूर असल्याने गावकऱ्यांचे मत आहे.तरुण पिढी- शेतीत भाजीपाला फळबागा व मका सोयाबीन यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेत आहे. त्यामुळे आजही पळसे गावची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. जमीन विकणाऱ्यांचे प्रमाण त्यामानाने अतिशय अमाप आहे.
२०,००० लोकसंख्या नाशिक तालुक्यात क्रमांक १ आहे. ग्रामपंचायत नगरपंचायतीत रूपांतर ०४/०६/२०१५ रोजी झाले आहे. भविष्यात पळसे गाव नाशिक महानगरपालिकेत जाण्याची शक्यता आहे. पळसे गावात ३ शैक्षणिक संस्था, ४ पतसंस्था कार्यरत आहेत. तसेच २ बँका आहेत. नाशिक सहकारी साखर कारखाना ही पळसे याकरिता गावाने १४० एकर जमीन ९९ वर्षाच्या कराराने दिलेली आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
पळसे शिवारात पार्ले कंपनी (मुंबई) यांचे युनिट आहे. येथे महिला व पुरुषांना रोजगार मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांनी अनेक येऊन नाशिक आणि मी फार्मिंग प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे. त्याद्वारे दर्जेदार गुळाचे विविध प्रकारचे उत्पादन करण्यात येत आहे .पळसे गावातील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे ८ बचत गट स्थापन केले आहेत. त्याद्वारे नाशिक शहरांमध्ये शेतकरी ते ग्राहक भागी विक्री केंद्र बारा वर्षापासून नियमित चालू आहे कृषी विभाग नाशिक यांचे आगामी मोठे सहकार्य आहेत त्याद्वारे १०० मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इयत्ता दहावीचे परीक्षेचे निकाल दहा वर्षापासून शंभर टक्के आहेत. हिंदी या विषयात अनेक विद्यार्थीमिनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या तसेच आजपर्यंत ३०० विद्यार्थी इंजिनिअरिंग विविध उत्तीर्ण होऊन देश परदेशात यश मिळवत आहेत.
पळसे गावात "पांढरी जमीन" तशी उभी माय "काळी जमीन" जास्त आहे त्यामुळे अर्थातच शेतीकडे सर्वांचे लक्ष असते. पळसे गावातील अनेक तरुण शेतकऱ्यांनी मूळ या भाजीपाला विकास आश्चर्यकारक प्रयोग करून लागवडीचे तंत्रात बदल करून भरघोस उत्पादन देईल अशी पद्धत शोधून काढले त्यामुळे मूळ उत्पादनात प्रचंड वाढ झाली पळसे गावात मूळ आज सर्वच प्रसिद्ध आहे.